Professor Michael Greenstone, Milton Friedman Distinguished Service Professor in Economics at the University of Chicago, visited the Maharashtra Pollution Control Board (MPCB) and held an engaging and insightful discussion with the Hon’ble Chairman and the Member Secretary.
Felicitation of Sh M Devender Singh IAS,Member Secretary MPCB. On 12th Oct, Hon Chief Justice of India
M Devender Singh IAS,Member Secretary MPCB The event was attended by Mr. Shunsuke Kawabe (Manager, Environment Bureau, Osaka City Government Japan),
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (म.प्र.नि.मंडळ) नवी मुंबई येथे “महाराष्ट्रातील शाश्वत विकासासाठी वृत्तीय अर्थव्यवस्था” या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचे उद्घाटन माननीय सदस्य सचिव श्री एम. देवेंदर सिंग (भा.प्र.से.) यांनी केले. डॉ. राजेंद्र राजपूत सहाय्यक सचिव (तांत्रिक), श्री. सतीश पडवळ सहसंचालक (एपीसी), श्री. संजय भुस्कुटे जनसंपर्क अधिकारी, श्री. नंदकुमार गुरव (तांत्रिक सल्लागार) यांच्यासह इतर अधिकारी तसेच कर्मचारी आणि सदस्यांनी त्यांच्या सन्माननीय उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, मटेरियल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अधिकारी, पर्यावरण तज्ञ, संशोधक आणि उद्योग प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आधार अबिलिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तात्काळ करण्यात येणाऱ्या उपयोजनांचे प्रात्यक्षिक आणि माहिती ( CPR) याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
१८ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्नाटक सरकारच्या केपीसीबीने बेंगळुरू येथे आयोजित केलेल्या "वृत्तीय अर्थव्यवस्था आणि शाश्वतता यावरील राष्ट्रीय परिषदेत" महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव माननीय श्री. एम. देवेंदर सिंग (आयएएस) यांनी पुनर्वापर क्षेत्रातील म. प्र. नि. मांडळाच्या प्रयत्नांचे एक अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. या कार्यक्रमादरम्यान, कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिव माननीय डॉ. शालिनी रजनीश (आयएएस) यांनी स्वतंत्र पुनर्वापर पार्क राज्य स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
प्लॅस्टिक रिसायकलिंग शो कॉन्फरन्स २०२५ सिंगल यूज प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष मा. श्री. सिद्धेशजी कदम यांच्या हस्ते झाले.
MPCB GreenMind AI चॅटबॉट अनावरण २०२५ पर्यावरण विषयक नियम आणि परवानग्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या 'MPCB GreenMind AI' या चॅटबॉटचे उद्घाटन, मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेशजी कदम आणि सदस्य सचिव मा. श्री. देवेंदरजी सिंग यांच्या हस्ते झाले.
कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी २०२५ पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून 'कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्मायक्रमाचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या हस्ते झाले.