Section Title

Main Content Link

परिचय

आमच्याविषयी

महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (म.प्र.नि.मंडळ) विविध विधिविधानांचे, मुख्यत्वे जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९७४, हवा (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, १९८१ या सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या अंतर्गत काही तरतूदींचे व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम १९९८, हानिकारक टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम २०००, महापालिका टाकावू घन पदार्थ नियम, २००० ईत्यादी सारख्या नियमांचे कार्यान्वयन करीत आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची काही महत्वाची कार्ये पुढील प्रमाणे आहेत.

म.प्र.नि.मंडळाची काही महत्त्वपूर्ण कार्येः
  • प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे.
  • प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तिचा  प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.
  • सांड पाणी किंवा व्यापारी सांड पाणी व टाकावू पदार्थांच्या निपटाऱ्याच्या सुविधांचे तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण करणे व उपचार संयंत्र, निपटाऱ्याच्या पद्धती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धती या विषयीच्या योजना, विनिर्देश किंवा इतर माहितीचा आढावा घेणे.
  • प्रदूषण नियंत्रण, टाकावू पदार्थांवर पुनर्प्रक्रिया करुन पुन्हा उपयोगात आणणे, पर्यावरणस अनुकूल पद्धती ईत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे.
  • योग्य प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान व पद्धती द्वारे पर्यावरण वृद्धीसाठी उद्योजकांना शिक्षित करणे व मार्गदर्शन देणे.
  • स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणा विषयी सार्वजनिक जागरुकता निर्माण करणे तसेच प्रदूषणा संबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे.