Section Title

Main Content Link

जल व हवा अधिनियम अंतर्गत संमती

संमती व्यवस्थापन

शुल्क | संमतीची माहिती | अनुसूची | संमतीपत्र देण्याचे अधिकार | परिपत्र | कार्यपध्दती 

ह्या अधिनियमांच्या तरतुदींच्या अंतर्गत, उद्योजक कोणता ही उद्योग किंवा प्रक्रिया चालवित असेल किंवा स्थापन करीत असेल की ज्यामधून सांड-पाणी, धुळ/धुर बाहेर निघून ज्यामुळे जमीनीवर किंवा हवेत अथवा कोणत्याही जल स्त्रोतात मिसळून पर्यावरणातील जल/हवा प्रदूषीत होत असल्यास त्याची संमती प्राप्त करणे आवश्यक आहे, जी दोन चरणांत मिळविणे गरजेचे आहे.

  • स्थापनेसाठी संमती: कोणताही उद्योग किंवा प्रक्रिया उभारण्यापूर्वी ही संमती घ्यावी लागते.
  • प्रचालनासाठी (ऑपरेशन) संमती: आवश्यक प्रदुषण नियंत्रण यंत्रणेसह उद्योगाची उभारणी पूर्ण झाल्यावर उत्पादन सुरू करण्यापूर्वी संमती घेणे आवश्यक आहे. ही संमती विशिष्ट कालावधीसाठी देण्यांत येते व त्याचे नियमितपणे नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
संमती प्रदान करण्यासाठी प्रदान केलेले अधिकार:

संमती आवेदन पत्रांच्या विल्हेवाटीमध्ये गती व सुलभीकरण आणण्याच्या दृष्टीने मंडळाने मंडळ कार्यालये, सदस्य सचिव व संमती मूल्यमापन समितीला अधिकार प्रदान केलेले आहेत.(कार्यालयीन आदेश दिनांक ०१/०३/२०१३)

अ.क्र. प्राधिकारी लाल श्रेणी नारिंगी श्रेणी हिरवी श्रेणी कॅन्टोंमेंट बोर्ड व अन्य नियोजन प्राधिकरणांसह शहरी स्थानिक संस्थाना संमती व अधिकारक्षेत्र टाउनशीप, आयटी पार्क, एसईझेड, महामार्ग, पाटबंधारे प्रकल्प, ईमारत व भवननिर्माण प्रकल्प या सारखे मूलभुत प्रकल्प
उप प्रादे.अधि. - - रु.५० कोटी पर्यंत - -
प्रादे.अधिकारी रू. १० कोटी उद्योग सोडून परिशिष्ट अ मध्ये सूचीबद्ध १५० कोटी पर्यंत ५०० कोटी पर्यंत ५० कोटी रुपयांची वरील ब आणि क - वर्ग नगर परिषदा आणि लष्करी छावणी बोर्ड २५ कोटी पर्यंत
विभाग प्रमुख रू. २५ कोटी पर्यंत रू. १०कोटी वरील रू. २५० कोटी पर्यंत रू. १५० कोटी वरील रू. १००० कोटी पर्यंत रू. ५०० कोटी वरील अ- वर्ग नगर परिषदा आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड -
संमती समिती रू. ७५ कोटी पर्यंत रू. २५ कोटी वरील रू. ७५० कोटी पर्यंत रू. २५० कोटी वरील रु . २००० कोटी पर्यंत रु .१००० कोटी वरील - रु . ३५० कोटी पर्यंत रु . २५ कोटी वरील
संमती मूल्यमापन समिती रुपये ७५ कोटी पेक्षा अधिक. रुपये ७५० कोटी पेक्षा अधिक. रुपये २००० कोटी पेक्षा अधिक. सर्व महानगरपालिका रुपये ३५० कोटी पेक्षा अधिक

नोंद घ्या:-

  • जेथे मागील एका वर्षात खटला भरणे/बंद करण्याचे निर्देश देणे यांच्यासारख्या कठोर कायदेशीर कारवाया केल्या गेल्या आहेत, तेथे नूतनीकरणाच्या अनुमतीची प्रकरणे संमतीच्या होकारासाठी किंवा नकारासाठी सर्व गटांसाठी पुढील उच्च प्राधिकरणाकडे संदर्भित केली जातील.
  • वर उल्लेखित सर्व आकडे भांडवली गुंतवणुकीशी संबंधित आहेत. भांडवली गुंतवणुकीत जमीन, इमारत, प्लांट आणि यंत्रे, जे घसाराविना आणि सी.ए.चे प्रमाणपत्र/वार्षिक अहवालानुसार विचारार्थ घेतले जाईल.
  • आरओच्या प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंतर्गत आवेदनांचे संबंधित एसआरओद्वारा प्रक्रियण झाले पाहिजे आणि ते आरओकडे निर्णयासाठी सादर केले पाहिजेत. त्याचप्रमाणे, एसआरओला प्रदान केलेल्या अधिकारांचं अंतर्गत पूर्वविलोकनासाठी आलेल्या आवेदनांचे एफओद्वारा प्रक्रियण झाले पाहिजे.
  • डहाणू, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, मुरुड जंजिरा; आरआरझेड; भातसा क्षेत्र; आदींसारख्या परिस्थितीक संवेदनशील कोणत्याही न्यायालयीन प्रकरणांमध्ये सामील प्रकरणे; पुनर्चक्रीकरण आणि पुनर्प्रक्रियणाच्या नोंदणीची प्रकरणे सदस्य सचिवाच्या अनुमतीने हाताळली गेली पाहिजेत.

जोडपत्र अ

अशा उद्योगांची यादी, ज्यांना संमती आणि प्राधिकरण व्यवस्थापनाच्या प्रत्यायोजनाद्वारा प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे वगळण्यात आले आहे.
  • भारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून पर्यावरणीय अनुज्ञा आवश्यक असलेल्या सर्व प्रकल्पांसाठी प्रथम चालविण्यासाठी आणि प्रस्थापित करण्यासाठी संमती.
  • आरआरझेड, सीआरझेड किंवा इतर प्रतिबंधित क्षेत्रांमधील किंवा ईसी गटांमधील सर्व आवेदने, ज्यांच्यात विस्तार, उत्पादामधील बदल, प्रक्रियेतील बदल आदी एकंदर प्रदूषण भार घटला किंवा वाढल्याच्या आधारावर अपेक्षित असतो.
  • औष्मिक उर्जा संयंत्र
  • स्पंज लोह संयंत्
  • कार्बनिक जैव उर्वरक आणि सुत्रीकरणे वगळून उर्वरके
  • सामाईक मैलापाणी अभिक्रिया संयंत्र (सीईपीटी) / सामाईक जोखमी कचरा अभिक्रिया संचय निपटारा सुविधा (सीएचडब्ल्यूटीएसडीएफ) / सामाईक जैव वैद्यकीय कचरा अभिक्रिया संचय निपटारा सुविधा (सीबीएमडब्ल्यूटीएसडीएफ) / सामाईक एमएसडब्ल्यू टीएसडी सुविधा
  • इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रिकल आर्क, इंडक्शन, कुपोला आणि ब्लास्ट फर्नेसीस असलेले उद्योग
  • उर्ध्वपातन भट्टी (मोलॅसीसवर आधारित)
  • कोक ओव्हन
  • बल्क ड्रग
  • कीटकनाशक तांत्रिक
  • सिमेंट
  • चामड्याचे कारखाने
  • कत्तलखाने
  • डाय आणि डाय इंटरमिडिएट
  • रंगद्रव्य आणि रंग निर्मिती
  • पेट्रोकेमिकल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स

25/08/2011 तारखेच्या महाराष्ट्र सरकारच्या जीआरनुसार २५/०८/२०११ पासून संमती शुल्कात सुधारणा

जल आणि वायु अधिनियमांच्या अंतर्गत एकाच संज्ञेसाठी एकत्रित संमतीसाठी शुल्के

उद्योजकांनी खाली दिलेल्या विवरणपत्रानुसार मंडळाला संमती शुल्क देणे आवश्यक असते. ही शुल्के पूर्ण भरलेल्या विहित अर्जाबरोबर संबंधित उप-प्रादेशिक कार्यालय किंवा प्रादेशिक कार्यालय किंवा मुख्य कार्यालय येथे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेतील डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात देय असतात. लाल, नारंगी आणि हिरव्या गटाच्या उद्योगांसाठी संमतीचा अवधि अनुक्रमे एक, दोन आणि तीन वर्षे इतका असतो. उद्योग त्या प्रमाणात शुल्क भरून 5 अवधिंसाठी वाढवून घेऊ शकतो.

दिनांक 25.08.2011 च्या सरकारी ठरावाने महाराष्ट्न सरकारने शुल्कामध्ये खालील प्रमाणे बदल केले आहेत ः -

B) Urban Local Bodies (Under water Act)
अ.क. उद्योगाची भांडवली गुंतवणुक जमीन इमारत व मशिनरी मिळून स्थापनेसाठी मंजूरी चालविण्यासाठी मंजूरी
१. १० करोड रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणुकीच्या ०.०२ टक्के भांडवली गुंतवणुकीच्या ०.०२ टक्के
२. 75 करोड रु. पेक्षा जास्त ते 100 करोड रु. पर्यंत रु.१,२५०००/- रु.1,25000/-
३. 50 करोड रु. पेक्षा जास्त ते 75 करोड रु. पर्यंत रु.१,००,०००/- रु.1,00,000/-
४. 25 करोड रु. पेक्षा जास्त ते 50 करोड रु. पर्यंत रु.75,000/- रु.75,000/-
५. 10 करोड रु. पेक्षा जास्त ते 25 करोड रु. पर्यंत रु50,000/- रु50,000/-
६. 5 करोड रु. पेक्षा जास्त ते 10 करोड रु. पर्यंत रु25,000/- रु25,000/-
७. 1 करोड रु. पेक्षा जास्त ते 5 करोड रु. पर्यंत रु15,000/- रु15,000/-
८. 60 लाख रु. पेक्षा जास्त ते 1 करोड रु. पर्यंत रु5,000/- रु5,000/-
९. 10 लाख रु. पेक्षा जास्त ते 60 लाख रु. पर्यंत रु1,500/- रु1,500/-
१०. रु. 10 लाखांपेक्षा कमी रु500/- रु500/-
B) शहरी स्थानिक संस्था पाणी कायद्यानुसार
१. महानगरपालिका रु1,00,000/-
२. महानगरपालिका वर्ग - अ रु50,000/-
३. महानगरपालिका वर्ग - ब रु5,000/-
४. महानगरपालिका वर्ग - क रु2,000/-

खाण प्रकल्प हे मंजूरी शुक्ल म्हणून खाण प्रकल्पाच्या भांडवली किंमतीनुसार होणाृया शुल्काव्यतिरीक्त प्रत्येक वर्षी एक टन खनीजाला रु. 0.40 या प्रमाणे शुक्ल अदा करतील.