Section Title

Main Content Link

हवेची गुणवत्ता - सभोवतालच्या हवेची गुणवत्ता मजबूतीकरणासाठी देखरेख

हवेची गुणवत्ता

प्रस्तावना:

महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील १५ शहरांमधील ४५ स्टेशन्सवरुन हवेच्या गुणवत्तेची देखरेख करणारी केंद्रे एम पी सी बी चालविते. ज्या संस्था परस्पर सी पी सी बी ला अहवाल देतात अशा स्वतंत्र संस्थामार्ङ्गत राष्ट्रीय हवा देखरेख कार्यक्रमा चा एक भाग म्हणून हे कार्य केले जाते. नुकतेच असे आढळून आले आहे की अशा केंद्राकडून हवेच्या गुणवत्तेबाबतची माहिती एम पी सी बी ला तयार स्वरुपात उपलब्ध होत नाही. हवेवरील देखरेख करणार्‍या केंद्रावर किंवा त्यांनी दिलेल्या माहितीवर किंवा अशा केंद्रांच्या हवेची गुणवत्ता नियंत्रण करण्याच्या कार्यावर नियमीतपणे देखरेख केली जात नाही. हवेचे प्रदुषण नियंत्रण करण्याची व्युहरचना ठरविण्यासाठी, माहितीचे पृथ्थकरण करण्यासाठी आणि इतर संबंधीत गोष्टींसाठी वेगवेगळ्या ठिकाणांवरील हवेच्या गुणवत्तेबाबतची माहिती, नियंत्रित करणारी एजन्सी म्हणून एम पी सी बी ला मिळणे आवश्यक आहे. ए ए क्यु एम बाबतची माहिती सर्वसामान्य लोकांना दररोज उपलब्ध व्हावी यासाठी एम पी सी बी व्दारे सदरची माहिती इलेक्ट्रानीक तसेच प्रिंट मिडीया वर तसे एम पी सी बी च्या वेब साईटवरही दिली जाते.

राज्यातील महत्वाची शहरे, औद्योगिक क्षेत्रे आणि संवेदनशील क्षेत्रे या बाबतची माहिती जमविण्यासाठी एम पी सी बी ला ए ए क्यु एम स्टेशन्सची आवश्यकता आहे. संपूर्ण महाराष्टाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सध्याचे ए ए क्यु एम च्या ४५ स्टेशन्सचे नेटवर्क हे पुरेसे नाही.

या सर्व विविध गोष्टींचा विचार करुन, हवेची गुणवत्ता वाढीचे संपूर्ण नेटवर्क मध्ये वाढ व्हावी यासाठी, आम्ही सी पी सी बी ला असे प्रस्तावित केले आहे की सध्या मान्यताप्राप्त असलेली एन ए एम पी ची सर्व स्टेशन्स चे व्यस्थापन एम पी सी बी ने करावे. या वाढीच्या आणि मजबुतीकरणाच्या प्रक्रीयेमध्ये एन ए एम पी च्या अखत्यारीत असलेल्या शहरांमध्ये काही नवीन स्टेशन्स वाढविली जातील आणि काही नवीन शहरांचा / औद्योगीक क्षेत्रे देखरेखी खाली आणली जातील.

सध्याची परिस्थिती:

महाराष्ट्र राज्यामध्ये मध्यवर्ती प्रदुषण नियंत्रण मंडळाची मंजूर झालेली एन ए एम पी ची ४५ केंद्रे आहेत. महाराष्ट्रा मध्ये सध्या असलेल्या एन ए एम पी च्या केंद्राची रुपरेषा तक्ता १ मध्ये दिली आहे. एम पी सी बी ने औरंगाबाद येथे ३ केंद्रे आणि डोंबिवली येथील २ केंद्रे नुकतीलच चालू केली आहेत. तसेच पर्यावरण शास्त्र विभाग, शिवाजी युनीर्व्हसिटी, कोल्हापूर यांचे वतीने कोल्हापूर येथेही तीन नवीन केंद्रे चालू करण्यात आली आहेत.

 

एन ए एम पी अंतर्गत देखरेख करणारी केंद्रे - सध्याची स्थिती

अ.क्र.
शहराचे नाव
केंद्रे क्रमांक
चालविणार शेरा

1.

मुंबई

3

एन इ इ आर आय

सी पी सी बी ने चालविलेली

2.

ठाणे

3

ठाणे महानगरपालिका

जुलै २००५ पासुन सुरु

3.

पुणे

3

पुणे युनिर्व्हसिटी

जुलै २००५ पासुन सुरु

4 नागपुर
3
विश्वेश्‍वरय्या नॅशनल इन्स्टीट्युट ऑङ्ग टेक्नॉलॉजी जुलै २००५ पासुन सुरु
3
एन इ इ आर आय

5.

चंद्रपूर

3

एम पी सी बी

जुलै २००५ पासुन सुरु

6.

औरंगाबाद

3

सरस्वती भुवन कॉलेज, औरंगाबाद

जुलै २००५ पासुन सुरु

7.

डोंबिवली - अंबरनाथ

2

एम पी सी बी

ऑक्टो. २००४ पासुन सुरु

8.

नाशिक

3

के टी एम एम कॉलेज, नाशिक

जुलै २००५ पासुन सुरु

9.

सोलापूर

2

वालचंद इन्स्टीट्यूट ऑङ्ग टेक्नॉलॉजी

जुलै २००५ पासुन सुरु

10.

कोल्हापूर

3

शिवाजी युनिर्व्हसिटी, कोल्हापूर

डिसें. २००५ पासुन सुरु

11.

तारापुर एमआयडीसी

3

एम पी सी बी

जाने. २००६ पासुन सुरु

12.

लोटे एम आय डी सी

2

एम पी सी बी

मार्च २००६ पासून सुरु

13.

तळोजा एम आय डी सी

3

के. बी. पी. कॉलेज वाशी

एप्रिल २००६ पासुन सुरु

14.

नवी मुंबई टी टी सी

3

के. बी. पी. कॉलेज वाशी

एप्रिल २००६ पासुन सुरु

15.

अमरावती

3

गर्व्हनमेंट इंजी. कॉलेज अमरावती

नोव्हे. २००६ पासुन सुरु

 
एकूण
45
   

 

एस ए एम पी अंतर्गत देखरेख करणारी केंद्रे - सध्याची स्थिती

अ.क्र.
शहराचे नाव
केंद्रे क्रमांक
चालविणार शेरा

1.

उल्हासनगर

3

सी एच एम कॉलेज, उल्हास नगर

 

2.

जालना

2

एम पी सी बी

 

3.

पुणे

1

पुणे युनिर्व्हसिटी

 

4.

नाशिक

1

एम पी सी बी

 

5.

नागपुर

1

एम पी सी बी

 

6.

औरंगाबाद

1

एम पी सी बी

 

 
एकूण
9
   

 

सी क्यु एम एस ची यादी - सध्याची स्थिती

अ.क्र.
शहराचे नाव
केंद्रे क्रमांक
चालविणार शेरा

1.

बांद्रा,मुंबई

1

मे. केमट्रॉल्स इंजी. लि.

 

2.

सोलापूर

1

मे. केमट्रॉल्स इंजी. लि.

 

3.

पुणे

1

मे. केमट्रॉल्स इंजी. लि.

 

4.

चंद्रपूर

1

मे. अल्ङ्गाटेक सर्व्हिसेस

 

5.

वाशी, नवी मुंबई

1

मे. केमट्रॉल्स इंजी. लि.

नवी मुंबई महानगर पालिके कडून व्यवस्थापनC

6.

मुलुंड, मुंबई

1

मे. अल्ङ्गाटेक सर्व्हिसेस

 

7.

सायन, मुंबई

1

एम पी सी बी

 

 
एकूण
7
   

 

मजबुतीकरणाचा प्रस्ताव :

मोठी शहरे, मेट्रो शहरे आणि महत्वाची औद्योगिक क्षेत्रे यांचा समावेश करण्यासाठी राष्ट्रीय हवा देखरेख कार्यक्रमाचे जाळे अधिक मजबुत करण्याची गरज आहे यावर सी पी सी बी ने यापूर्वीच भर दिलेला आहे. ए ए क्यु एम देखरेख करणारी नवीन केंद्रे उघडण्यासाठी लागणारा ्र घरा घरातील तपशिलवार सर्व्हे म पी सी बी ने यापूर्वीच केलेला आहे. महाराष्ट्रातील ए ए क्यू एम चे जाळे मजबुत करण्यासाठी एम पी सी बी ने प्रस्ताव तयार केलेला आहे, तो तक्ता २ मध्ये देण्यात आलेला आहे. एम पी सी बी च्या संपूर्ण देखरेखी खाली आणि नियंत्रणाखाली, महाराष्ट्रातील निवडक शैक्षणिक संस्थां मार्ङ्गत वरील यादीतील नमूद केलेल्या सर्व केंद्रांचे व्यवस्थापन केले जावे असे प्रस्तावित करण्यात आले आहे.

निवडण्यात आलेल्या ठिकाणांबाबतचे स्पष्टीकरणही त्याच तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे. जनसामान्यामध्ये होत असलेली जागृती पहाता मोठ्या शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबतची शास्त्रोक्त माहिती असणे गरजेचे आहे. तारापूर. टी टी सी, तळोजा इ. सारख्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रामध्येही हवेची संपूर्ण देखरेख करण्याची गरज आहे कारण या सर्व मोठ्या औद्योगिक क्षेत्रांच्या जवळच निवासी वाढीची केंद्रे आहेत. एन ए एम पी ला आधार देण्यासाठी शास्त्रोक्त राज्य हवा देखरेख कार्यक्रमाचा विकास करण्याचाही समावेश या मजबुतीकरणा मध्ये करण्यात आलेला आहे.

कामकाजाची व्यवस्था:

दि. १७.१.०५ रोजी महाराष्ट्रातील ए ए क्यू एम जाळ्याच्या मजबुतीकरणाबाबत सी पी सी बी च्या अध्यक्षांशी चर्चा करण्यात आली. सदर चर्चेबाबतचे टिपण सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ मध्ये देण्यात आलेले आहे. ए ए क्यु एम जाळ्याचे मजबुतीकरण करण्याबाबत सी पी सी बी ने यापूर्वीच भर दिलेला आहे आणि ओ आणि एम साठी एस पी सी बी ला ५० टक्के समान वर्गणी मंजूर केलेली आहे, तसेच दिनांक ११.१२.२००० रोजीच्या मंडळाच्या ११८ व्या सभेच्या निर्णया नुसार, प्रस्तावित वाढीसाठी सुरवातीच्या भांडवलामध्ये वर्गणी देण्यासही मंजूरी दिलेली आहे.

त्याप्रमाणे दिनांक १८.३.०५ रोजी आम्ही सी पी सी बी ला , ए ए क्यू एम च्या मजबुतीकरणासाठी तपशिलवार प्रस्ताव दाखल केलेला आहे. एन ए एम पी केंद्रांचे मजबुतीकरण २८ ते ५८ पर्यंत करण्यासाठी एम पी सी बी ला सी पी सी बी कडून ५० टक्के समान वर्गणी देण्यात येईल. ज्यामध्ये प्रस्तावीत २७ केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे त्या केंद्राचे व्यवस्थापन एम पी सी बी स्वतः करेल.

ए ए क्यू एम ची सर्व केंद्रे बाह्य शैक्षणिक / संशोधन संस्थाच्या तर्ङ्गे एम पी सी बी चालवेल. या प्रस्तावीत वाढीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक केंद्रासाठी एका निवडक शैक्षणिक संस्थेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एन ए एम पी आणि एम पी सी बी सर्व कार्यांमध्ये एम पी सी बी समन्वय साधेल आणि महाराष्ट्र राज्यासाठी निश्चीत अशी माहिती सी पी सी बी ला पुरवेल. या सर्व केंद्राच्या कामकाजावर एम पी सी बी कडून नियमीतपणे देखरेख केली जाईल आणि गुणवत्ता नियंत्रणाची खात्री देईल. या सर्व केंद्राचे काम परिणामकारकरित्या होण्यासाठी लघु प्रशिक्षण देण्याचेही एम पी सी बी ने प्रस्तावित केले आहे.

अशा प्रकारे हवेच्या गुणवत्तेच्या जाळ्याचे सर्वंकष माहिती आधारित व्यवस्थापनामध्ये तज्ञ मोजणी क्षमतेचाही समावेश आहे. या जाळ्यामधुन जमा झालेल्या माहीतीचे योग्य ते मुल्यमापन केल्यानंतर ती माहीती नियमीतपणे वेबसाईटवर घेणे आवश्यक आहे. जनसामान्यांच्या माहितीसाठी आणि उपयोगासाठी अशी माहिती कमीत कमी सहा - सहा महिन्यांनी जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आ तर्‍हेची सर्व कामे म्हणजे माहिती गोळा करणे, संकलीत करणे, मूल्यमापन करणे आणि जाहीर करणे ही कामे शास्त्र आणि तंतज्ञान पार्क, पुणे युनिर्व्हसिटी या सारख्या प्रख्यात संस्थाकडे सोपविण्यात यावीत असे प्रस्तावित करण्यात आले आहे.

अशाा संस्थाबरोबर करण्यात आलेली प्रस्तावीत वाढीची व्यवस्था ही मोठ्या कालावधीसाठी, तो कालावधी ५ वर्षांचाही असू शकेल, असावी असेही प्रस्तावित करण्यात आले आहे. पाच वर्षांनंतर साधने बदली करावी लागतील. यामुळे एम पी सी बी ने दिलेल्या भांडवलाचा अधिक चांगला उपयोग होऊ शकेल आणि संस्थेच्या पातळीवर जास्त प्रमाणात आवड निर्माण होईल. या प्रस्तावित व्यवहारासंबंधी या संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्याचेही प्रस्तावित आहे.

List of proposed stations approved in the 146th Board Meeting (proposal)

अ.क्र.
शहराचे नाव
प्रस्तावित एनएएमपी
प्रस्तावित एसएएमपी

एकूण

शेरा

1.

मुंबई

3

4

7

सध्या शहरामध्ये ३ एम ए एम पी केंद्रे आहेत ती ङ्गारच अपुरी आहेत.

2.

पुणे

1

--

1

जास्तीत जास्त प्रदुषीत औद्योगिक क्षेत्रे असणार्‍या ११ शहरांमधील हे एक शहर आहे त्यामुळे हवेच्या गुणवत्तेच्या केंद्राचे योग्य वाटप होण्यासाठी आणिखी केंद्रे असण्याची गरज आहे.

3.

कल्याण डोंबिवली

--

2

2

डोंबिवली मध्ये औद्योगिक क्षेत्राच्या जवळच निवासी विकास झालेला आहे कल्याण ला सुध्दा महानगर पालिका आहे त्यामुळे जास्त ए ए क्यू एम केंद्रांची गरज आहे.

5.

भिवंडी

--

2

2

भिवंडी हे महानगरपालिका असलेले औद्योगिक शहर आहे आणि तेथून हवेच्या प्रदुषणाच्या तक्रारी नियमीतपणे येत असतात. त्यामुळे ए ए क्यू एम ने ए ए क्यु बाबतची माहिती नियमीतपणे गोळा करणे आवश्यक आहे.

6.

रोहा

--

2

2

रोहा येथे मोठे औद्योगिक क्षेत्र स्थापन झालेले आहे व तेथे ए ए क्यु एम ची नियमीत केंद्रे असण्याची आवश्यकता आहे.

7.

चंद्रपुर

--

3

3

 

8.

अकोला

1

2

3

येथे महानगरपालिका आहे आणि ए ए क्यु एम केंद्रांची गरज आहे.

9.

महाड

3

--

3

येथे मोठे औद्योगिक क्षेत्र स्थापन झालेले आहे व तेथे ए ए क्यु एम ची नियमीत केंद्रे असण्याची आवश्यकता आहे.

10.

जळगाव

--

3

3

येथे महानगरपालिका आहे आणि ए ए क्यु एम केंद्रांची गरज आहे.

11.

अहमद नगर

3

2

5

येथे महानगरपालिका आहे आणि ए ए क्यु एम केंद्रांची गरज आहे.

12.

सांगली

--

3

3

येथे महानगरपालिका आहे आणि ए ए क्यु एम केंद्रांची गरज आहे.

13.

नांदेड

--

3

3

येथे महानगरपालिका आहे आणि ए ए क्यु एम केंद्रांची गरज आहे.

14.

लातुर

--

3

3

येथे महानगरपालिका आहे आणि ए ए क्यु एम केंद्रांची गरज आहे.

 

15.

धुळे

--

3

3

येथे महानगरपालिका आहे आणि ए ए क्यु एम केंद्रांची गरज आहे.

 
एकूण
11

32

43