Section Title

Main Content Link

औद्योगीक स्थाने - बापु कुटीर क्षेत्र

औद्योगीक स्थाने

बापु कुटीर क्षेत्रामधील प्रतिबंध

पर्यावरण व वने मंत्रालय, भारत सरकार, यांच्या पत्र क्रमांक जे-11011/21/93आयए. II(I) दिनांक 23 फेब्रुवारी 1994 द्वारे बापु कुटीर पासून 10 किलो मिटर त्रिज्येच्या परीसरात उद्योग आदींच्या स्थापने वर प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. नॉन-ओब्नोक्सीयस, अ-हानिकारक तसेच प्रदूषण न करणाऱ्या व केवळ औद्योगीक वसाहती सारख्या मान्यता प्राप्त ठिकाणी, हिरव्या श्रेणी अंतर्गत येत असलेल्या उद्योगांनाच बापु कुटीर क्षेत्रामध्ये स्थापन करण्याची किंवा विस्तारीकरणाची अनुमती खालील अटींच्या अधिन देण्यात आली आहे.

  1. धुळ व धुरांच्या बाबतील राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मानकांची पूर्तता करण्यात यावी.
  2. संलग्नक - 1 मध्ये दिलेली प्रक्रियेचा समावेश नाही.
  3. कारखान्यामध्ये किंवा इतर सहायक प्रक्रियेमध्ये इंधनाचा उपयोग करण्यास परवानगी नाही.
  4. धुर निघण्यास प्रतिबंध असावा.