Section Title

Main Content Link

23/02/2012 तारखेस 100 बेड्स आणि अधिक असणाऱ्या रुग्णालयांचा डेटाबेस

बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन

जीव-वैद्यकीय कचरा नियमांच्या अंतर्गत मंडळाद्वारा अनुमोदन मिळालेल्या 100 बेड्स आणि अधिक असणाऱ्या रुग्णालयांची यादी बनविण्यात अली आहे आणि रुग्णालय प्राधिकरणाच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या प्राधिकरणाकडून टिपण्या/सूचना मागविण्यात आल्या आहेत.

प्रादेशिक अधिकारी, बीएमडब्ल्यू विभाग,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,
तिसरा मजला, कल्पतरू पॉइंट,
सिने प्लॅनेट सिनेमासमोर,
सायन (पूर्व), मुंबई – 400 022
फोन/फॅक्स - 24044533

ईमेल : robmw@mpcb.gov.in

  1. उपलब्ध डेटा आणि नोंदींवरून यादी बनविण्यात आली आहे आणि या यादीत अनवधानाने काही रुग्णालये राहून जाण्याची शक्यता आहे. (यादीसाठी येथे क्लिक करा)

  2. या गटात येणारी रुग्णालये, पण ज्यांची नावे किंवा प्राधिकरणे या यादीत दिसत नाही, त्यांनी त्वरित कळवावे आणि यांच्याशी संपर्कात राहावे:

  3. जर एखाद्या रुग्णालयाने नूतनीकरणासाठी आवेदन केले असेल आणि या यादीत नाव आले नसेल, तर त्याने सादर केल्याची तारीख, कोणत्या कार्यालयात ते सादर केले ते कार्यालय, भरलेली शुल्के, डी. आर. क्र, आणि तारीख आदींसहित अर्जाचे तपशील वरील पत्त्यावर (म्हणजेच, प्रादेशिक कार्यालय, बीएमडब्ल्यू) पाठवावेत.

  4. या गटात येणाऱ्या सर्व रुग्णालयांना जलद पत्रव्यवहारासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे ईमेल अॅड्रेस आणि संपर्क क्रमांक पुरविण्याची मंडल विनंती करीत आहे आणि ते वरील म्हणजेच, robmw[at]mpcb[dot]gov[dot]in वर अद्ययावत माहिती देतील.

  5. सर्व एचसीईजचे लक्ष वेधून घेण्यात येते की, रुग्णालयाच्या प्राधिकरणाद्वारा नुतनीकरण अधिकार-पत्रासाठी आवेदन अगोदरचे अधिकार-पत्र समाप्त होण्याच्या कालावधीच्या तीन महिने अगोदर करणे आवश्यक आहे.