Section Title

Main Content Link
महाराष्ट्रातील निर्माण होणाऱ्या घरगुती सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी STP ची कार्यक्षमता वाढविणे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीवर परिषद आयोजित करणे

(दि. १०.०२.२०२५ रोजी  आय.आय.टी मुंबई येथे परिषद घेण्यात आली.) 

सदर कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नगर विकास विभाग, इतर संबंधित उपस्थित होते व त्यांना घरगुती सांडपाण्याच्या आधुनिक प्रक्रिया यंत्रणांची माहिती देण्यात आली.  या कार्यशाळेत महाराष्ट्रात सद्य:स्थितीत किती घरगुती सांडपाणी निर्माण होते, त्यापैकी किती सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, सद्य:स्थितीत किती सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणा कार्यरत आहेत व किती सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा प्रस्तावित आहेत, याबाबत माहिती देण्यात आली.  पारंपारिक पध्दतीचे सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेची, आधुनिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेशी तुलना केल्यानंतर कोणते फायदे व तोटे आहेत, याबाबत माहिती डॉ.राकेश कुमार, अध्यक्ष, सोसायटी फॉर इंन्डोर एन्व्हायर्नमेंट यांनी दिली.  निसर्गावर आधारित सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेबाबत माहिती डॉ.अनिल कुमार दिक्षीत, आयआयटी, मुंबई यांनी देण्यात आली. शाश्वत सांडपाण्यावर प्रक्रिया (पुनर्वापर/पुनचक्रण) करण्याचा मार्ग मोकळा करणे याबाबतची माहिती श्री.ब्रिजेश कुमार दुबे, आयआयटी,खरगपूर यांनी दिली.  सांडपाणी पायाभूत सुविधा विकासात तांत्रिक मार्गदर्शन याबाबतची माहिती श्री.तन्मय कांबळे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  यांनी दिली.  सांडपाणी प्रक्रियेबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना काय अडचणी येतात व त्यावर काय मार्ग आहे, याबाबत सदर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.  आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी व्यवस्थापनाबाबत श्री.आदित्य भट्ट, सहसंचालक, मे.एचएनबी इंजिनियर्स प्रा. लि. व श्री.कैलास शिरोडकर , मुख्य कार्यकारी अधिकारी, मे. इको एन्व्हायरो प्रॅक्टिस  यांनी माहिती दिली.