Expand and Collapse Menu  
     आमच्या विषयी-महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना
महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध अधिनियम, 1969, च्या तरतुदीनुसार 7 सप्टेंबर 1970 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. केन्द्रीय विधिविधान असलेल्या जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 च्या कलम 4 च्या तरतुदींनुसार दिनांक 1.6.1981 रोजी महाराष्ट्रामध्ये जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 लागू करण्यात आला आणि तदनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तयार करण्यात आले. हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 महाराष्ट्रामध्ये 1983 मध्ये लागू करण्यात आला आणि प्रारंभी काही क्षेत्र हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून दिनांक २.५.१९८३ रोजी घोषित करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र राज्य दिनांक ६.११.१९९६ पासून हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 च्या कलम 5 अनुसार हे मंडळ राज्य मंडळ म्हणून कार्यरत आहे.

जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 च्या कलम 4 व हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 च्या कलम 5 च्या तरतुदीमध्ये सांगीतल्याप्रमाणे अध्यक्ष, सदस्य सचिव तसेच शासकीय व अ-शासकीय सदस्यांचा मंडळामध्ये समावेश आहे. 
 
 
 
 
 
This webpage is last modified on Tuesday, June 06, 2017 05:26:46 IST
Go to top
  © 2009 सर्व हक्क राखीव. छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती|आरोग्य आणि पर्यावरण| वेब लिंक्स| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप 
समर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022